जिल्हा क्रीडा स्पर्धेत येवल्याच्या मायबोली दिव्यांग शाळेने पटकावली ९  सुवर्ण पदकांसह एकूण 22 पदके

0

येवला (प्रतिनिधी)जिल्हा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद नाशिक व सक्षम फाउंडेशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आज शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२५ रोजी नाशिक येथील सेंट झेवियर हायस्कूलच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पाडल्या. या स्पर्धेत समता प्रतिष्ठान येवला चालवीत असलेल्या मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील २३ दिव्यांग विद्यार्थ्यांनी विविध खेळ प्रकारामध्ये अत्यंत उत्कृष्ट सहभाग घेतला होता…  ८ ते १२ या वयोगटांमध्ये लांब उडी क्रीडा प्रकारात *प्रतिक्षा किरण जाधव* हिने प्रथम क्रमांक मिळविला तर ५० मीटर धावणे व लांबउडी या क्रीडा प्रकारात *साई राहुल बोऱ्हाडे* याने द्वितीय क्रमांक मिळविला.  १३ ते १६ या वयोगटांमध्ये लांबउडी या क्रीडा प्रकारात *साई सूर्याजीराव झाल्टे* याने प्रथम क्रमांक तर १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात *भाग्यश्री किरण जाधव* हिने द्वितीय क्रमांक   मिळविला.  तर गोळाफेक या क्रीडा प्रकारांमध्ये मुलींमध्ये *प्रतीक्षा देवरे* हिने प्रथम क्रमांक तर *पूजा नंदू जगताप* हिने तृतीय क्रमांक मिळविला. 

     १७ ते २१ या वयोगटांमध्ये २०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात मुलांमध्ये *साईराम देवकाते* याने प्रथम क्रमांक व *पवन फापाळे* याने द्वितीय क्रमांक मिळविला तर मुलींमध्ये पहातात *ज्ञानेश्वरी कड* हिने द्वितीय क्रमांक व *तेजश्री केसकर* हिने तृतीय क्रमांक मिळविला. ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात *संदेश केसकर* याने प्रथम क्रमांक तर *आदित्य सालपुरे* यांने द्वितीय क्रमांक मिळविला तर मुलींमध्ये *शिवानी संजय हिरे* हिने प्रथम क्रमांक व *जयश्री रामदास पगारे* हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. 

           १७ ते २१ या वयोगटासाठी घेण्यात आलेल्या लांब उडी या क्रीडा प्रकारांमध्ये मुलांमध्ये *संदेश केसकर* प्रथम क्रमांक तर *पवन फापाळे* याने द्वितीय क्रमांक मिळविला तर मुलींमध्ये *ज्ञानेश्वरी कड* हिने प्रथम क्रमांक व *शिवानी हिरे* हिने द्वितीय क्रमांक मिळविला. गोळा फेक या क्रीडा प्रकारामध्ये मुलांमध्ये *साईराम देवकाते* याने प्रथम क्रमांक व *आदित्य सालपुरे* याने द्वितीय क्रमांक पटकविला तर गोळा फेक याच क्रीडा प्रकारात मुलींमध्ये *जयश्री रामदास पगारे* हिने तृतीय क्रमांक पटकविला. अत्यंत आनंददायी आणि निकोप वातावरणात संपन्न झालेल्या या दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन नाशिक जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती असिमा मित्तल यांच्या शुभ हस्ते आणि  नाशिक विभागीय उपायुक्त मा. माधव वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर,सक्षम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी,सेंट झेवियर हायस्कूलचे मुख्य फादर या सर्वांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. 

       या क्रीडा स्पर्धेत मायबोली निवासी कर्णबधिर विद्यालयातील वरील सर्व दिव्यांग विद्यार्थ्यांनी ९ सुवर्ण,१० रजत तर ३ ब्रांझ पदके अशी एकूण २२ पदके पटकविली आहेत….  यशस्वी सर्व स्पर्धकांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर मॅडम, माजी आमदार मारोतराव पवार,व संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे,वैसाका भरत चौधरी साहेब, सहाय्यक सल्लागार कैलास ऊईके साहेब, संस्थेचे सरचिटणीस दिनकर दाणे, संस्थेचे संचालक एड्. शरद कोकाटे,सलील पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब कोकाटे आदींनी अभिनंदन केले आहे. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील हेमंत पाटील, सुखदेव आहेर, संतोष कोकाटे, मंदा पडोळ, रेखा दुनबळे, रावसाहेब खराटे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here