नगरचे धावपटू दक्षिण अफिक्रेत भारताचा डंका वाजविणार- गौरव फिरोदिया

0

अहमदनगर –  संपूर्ण जगात सर्वात कठीण अशी समजली जाणारी कॉम्रेडस् मॅरेथॉन स्पर्धा समजली जाते. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या या स्पर्धेत नगरचे चार धावपटू  सहभागी होत भारताचा डंका वाजवणार ही सर्वांनाच खात्री आहे. नगरमध्येही अनेक प्रतिभावंत खेळाडू आहेत. या खेळाडूंनी या पुर्वीही अशा स्पर्धात नगरचे नाव उंचाविले आहे. या स्पर्धेतही ते यशस्वी होतील, असा विश्वास उद्योजक गौरव फिरोदिया यांनी व्यक्त केला.

     अहमदनगर रनर्स क्लबच्या वतीने दक्षिण आफ्रिकेतील मॅरेथॉन स्पर्धेसाठी तीन योगेश खरपुडे, जगदीप मकर, गौतम जायभाय व अहमदनगर सायकलिंग क्लबचा रवि पत्रे हे जात आहेत. या चारही धावपटूंना अहमदनगरांच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी गौरव फिरोदिया, जि.प.मुख्य कार्य.अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त एसपी प्रशांत खैरे, छावणी परिषदेचे मुख्य कार्य.अधिकारी विक्रांत मोरे रनर्स क्लबचे सदस्य उपस्थित होते.

     यावेळी धावपटूंचे मनोबल वाढवितांना श्री.येरेकर म्हणाले, यापूर्वीही रनर्स नी जागतिक मॅरेथॉनमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या स्पर्धेतही हे चारही खेळाडूं आपल्या परिश्रमाने यश मिळवतील, त्यांच्या पाठिशी सर्वांच्या शुभेच्छा आहेत, असे सांगितले. याप्रसंगी प्रशांत खैरे यांनीही खेळाडूंच्या उत्साह पाहता ही स्पर्धा यशस्वी, असा विश्वास व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी विक्रांत मोरे यांनीही या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

     यावेळी धावपटूंनी आमची क्षमता आणि सहन शक्तीची कसोटी असल्याने आम्ही यश मिळवून नगरचे नाव परदेशात उंचविण्याचे ध्येय ठेवून स्पर्धा पूर्ण करु. सर्वांच्या शुभेच्छांमुळे आमचा आत्मविश्वास आणखी वाढला असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here