अकोला : प्रभात किड्स स्कूलच्या चार ज्युदोपटूंनी विभागस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे अतंर्गत अमरावती क्रीडा कार्यालयाद्वारे विभागस्तरीय स्पर्धेचे आयोजन श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालय, अमरावती येथे दि. २८ आणि २९ डिसेंबर दरम्यान करण्यात आले होते.
या स्पर्धेत ‘प्रभात’च्या १४ वर्षाखालील गटात सृष्टी काळे हीने प्रथम क्रमांक पटकविला तर १७ वर्षाखालील विविध वजन गटात तेजल दिघे, संचिता राठोड आणि राजनंदिनी बुंदेले यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या चारही ज्युदोपटूंची निवड राज्यस्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे. विजयी खेळाडूंना प्रभातच्या ज्युदो प्रशिक्षक किरण बुंदेले यांचे मार्गदर्शन प्राप्त झाले.
‘प्रभात’च्या प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह प्रभातच्या शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.