फैजान शारवान याची 19 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड 

0

महाबळेश्वर (प्रतिनिधी) : महाबळेश्वर येथील फैजान असिफ शारवान याची 19 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झालेली असून हा तालुक्यातील पहिला क्रिकेटपटू आहे त्याची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील क्रिकेट प्रेमींकडून फैजान वर शुभेच्छांचा वर्षाव होत असून चौका चौकात शुभेच्छा देणारे फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत.

     सातारा जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघातून नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र संघात आपले स्थान निश्चित केले.राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आनंद नगर जम्मू कश्मीर येथे होणार आहे.

        फैजान आसिफ शारवान हा अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे अकरावी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असून येथील क्रीडा शिक्षक श्री मुनसिफ वारुणकर सर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here