बारामती : म्हाळुंगे-बालेवाडी पुणे, या ठिकाणी चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये बारामतीची उदयोन्मुख खेळाडू कु.भक्ती तानाजी गावडे हीने थाळीफेक या क्रीडा प्रकारामध्ये सुवर्णपदक पटकावले आहे, ४१ मीटर लांब थाळीफेक करत भक्तीने महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे.
भक्ती गेली चार वर्षे प्रसाद रणवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे, तसेच नोव्हेंबर महिन्यात भोपाळ या ठिकाणी झालेल्या युथ गेम्सच्या ट्रायलसाठीही तिची निवड झाली होती, तिच्या या कामगिरीचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.