न्यूयॉर्क : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये असताना हृदयविकाराच्या धक्क्यानं त्यांचं निधन झालं आहे.
मुंबई क्रिकेट संघटनेनं एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत काळे यांच्या निधनाची माहिती दिली आहे.
अमेरिकेमध्ये सध्या टी 20 क्रिकेट विश्वचषकाचे सामने सुरू आहेत. त्यानिमित्ताने अमोल काळे न्यूयॉर्कला गेले होते, अशी माहिती मिळाली आहे. त्याठिकाणी हृदयविकाराचा धक्का आल्यानं त्यांचं निधन झालं.
रवी शास्त्री यांनीही एक्सवर पोस्ट करत अमोल काळेंच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.