उरण दि २६(विठ्ठल ममताबादे) : राजकीय, सामाजिक क्षेत्राबरोबरच क्रीडा क्षेत्राचीही तेवढीच आवड असणारे कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या शुभहस्ते दरवर्षी प्रमाणे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या वर्षीच्या क्रिकेट सिझनचे उद्घाटन करण्यात आले. क्रिकेटची आवड असल्याने चौफेर फटकेबाजी करत महेंद्रशेठ घरत यांनी क्रिकेटचा आनंद लुटला.
सिनियर क्रिकेट क्लब व मॉर्निंग क्रिकेट क्लब या दोन संघाचे जवळजवळ ९० सभासद आहेत या सर्वांना महेंद्रशेठ घरत यांनी टिशर्ट दिले. हा उद्घाटनाचा कार्यक्रम एएससी कॉलेजच्या पटांगणावर पार पडला. यावेळी दोन्ही संघाचे कर्णधार, उपकर्णधार तसेच मिलिंद मोटघरे, देवेंद्र चौधरी, बाबू दहिया, उद्योगपती मनोज पाटील, रविंद कोटियान, नांदगांवकर, माऊली पोपट, मुरलीधर ठाकूर उपस्थित होते.