वन-डे वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयची बैठक

0

मुंबई : बीसीसीआयने 1 जानेवारीला एक बैठक घेतली. मुंबईतील एक हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. जवळपास 4 तास ही बैठक चालली. यामध्ये भारतीय टीमचे हेड कोच राहुल द्रविड, नियमित कर्णधार रोहित शर्मा, एनसीए हेड व्हीव्हीएस लक्ष्मण तसंच चीफ सिलेक्टर चेतन शर्मा यांना समावेश होता. या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

बीसीसीआयने काही मोठे निर्णय घेतले ते असे –

अनेकदा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूचा टीम इंडियामध्ये समावेश केला जातो. मात्र आता असं होणार नाही. टीममध्ये निवड होण्यापूर्वी देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारे युवा खेळाडूंचं सिलेक्शन होणार आहे.

यो-यो टेस्टशिवाय डेक्सा टेस्ट पास करणं आता बंधनकारक असणार आहे. या टेस्टमध्ये पास होणाऱ्या खेळाडू टीममध्ये जागा दिली जाणार आहे.

आगामी दौरे आणि आगामी वनडे वर्ल्डकप पाहता एनसीएन आयपीएल टीमसोबत काम करणार आहे. यावेळी अशा खेळाडूंवर लक्ष ठेवले जाईल, जे आयपीएल 2023 चा भाग असतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here