विनेश फोगाटचे पंतप्रधान मोदींना पत्र लिहित खेलरत्न-अर्जुन पुरस्कार परत करण्याची केली घोषणा

0

नवी दिल्ली : साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतल्यानंतर पैलवान बजरंग पुनियाने आपला पद्मश्री पुरस्कार परत केला, त्यापाठोपाठ आता पैलवान विनेश फोगाटने खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कार परत केला आहे.

बजरंग पुनियाने पद्मश्री परत केल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने 24 डिसेंबर रोजी नव्याने निवडून आलेली कुस्ती महासंघाची कार्यकारिणी रद्द केली होती. यानंतर साक्षी मलिक विरुद्ध बृजभूषण सिंह वादावर पडदा पडेल असं वाटत असतानाच विनेशने आपला पुरस्कार परत केला आहे. आपल्या पत्रात विनेशने पंतप्रधान नरेंद्र मोदींना या प्रकरणासाठी वेळ काढून लक्ष द्यावे अशी विनंती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात विनेश फोगाट म्हणते की बजरंग पुनियाने आपल्या हृदयावर दगड ठेऊन हा पुरस्कार परत केला असेल. त्यानंतर आता मला माझे पुरस्कार पाहून लाज वाटत आहे.विनेश म्हणते की 2016 साली जेव्हा साक्षीने देशासाठी मेडल आणलं होतं तेव्हा तुम्ही तिला बेटी बचाओ बेटी पढाओची सदिच्छादूत बनवलं. आमचे फोटो देखील तुम्ही तुमच्या अभियानासाठी वापरले. ते वापरण्यास काही हरकत नाही पण आमचं जीवन हे पोस्टर सारखं चकचकीत नाही. गेल्या काही वर्षांत महिला पैलवानांनी जे दुःख भोगलं आहे ते सांगण्यापलीकडचे आहे, असं विनेशने म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here