कोपरगांव: संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या बास्केटबॉल संघाने १९ वर्षे वयोगटांतर्गत संगमनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये १३ संघातुन प्रथम क्रमांक पटकावुन संजीवनीची क्रीडा क्षेत्रातील विजयी षृंखला कायम ठेवली आहे. बहुआयामी विद्यार्थी घडकवण्यासाठी व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलुंची गरज असते, या विचारधारेनुसार संजीवनीमध्ये शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच खेळालाही अणन्य साधारण महत्व दिल्या जाते, यामुळेच संजीवनीच्या खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये विजयी मालिका कायम ठेवली आहे, अशी माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धा घेण्यात आल्या. संजीवनीच्या खेळाडूंनी पहिल्या फेरीत राहुरी तालुक्याच्या संघावर एकतर्फी विजय मिळविला. दुसऱ्या फेरीत राहाता तालुक्याच्या संघावर विजय मिळवुन थेट अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार अलीमोहम्मद फिरोज शेख याच्या नेतृत्वाखाली खेळाडू आदित्य बाळासाहेब खर्डे, अथर्व योगेश जपे, श्रेयश चंद्रशेखर काजळे, अथर्व भागवत पानगव्हाणे, ओम अशोक जाधव, अथर्व शरद मापारी, आदर्श गणेश रहाणे, स्पंदन राहुल अमृतकर, साईराज विशाल पवार व रोहण नितिन चव्हाण यांनी उत्कृष्ट खेळाचे कौशल्य दाखवत अंतिम सामन्यात संगमनेर तालुक्याच्या संघावर विजयश्री मिळवुन जिल्ह्यात संजीवनी प्रथम असल्याची मोहर उमटवली.
पुढील विभागीय स्पर्धा सोलापुर जिल्ह्यातील अकलुज येथे होणार असुन पुणे शहर व ग्रामिण, पिंपरी चिंचवड, नाशिक शहर व ग्रामिण आणि अहमदनगर शहर व ग्रामिण असे सात संघ या स्पर्धेत सहभागी असणार आहे. संजीवनीचे खेळाडू अहमदनगर ग्रामिणचे नेतृत्व करणार आहेत. क्रीडा प्रशिक्षक शिवराज पाळणे, अक्षय येवले व सत्यम कोठळकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्पर्धेमध्ये सुध्दा जिंकायचेच, अशी खुनगाठ खेळाडूंनी बांधली बांधली आहे.
संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंडगे व सर्व प्रशिक्षकांचेही अभिनंदन केले.