उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) ; आजच्या युवा पिढीला स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी उरण तालुक्यातील कडापे येथे कडापे अंडर १४ च्या क्रीडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते.आयोजनाचा उद्देश एकच की नवीन व होतकरू खेळाडू तयार व्हावेत व क्रीडात्मक विकास हा लहानपणापासूनच खेळाडूंमध्ये तयार व्हावा यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये प्रामुख्याने आठ संघांमध्ये राहून रॉबिन पद्धतीने हे अंडर आर्म सामने खेळवण्यात आले. व त्यामध्ये आवरे खासरीपाडा टीमने या मालिकेच्या विजतेपद मिळवले. व कडापे इलेव्हन संघाने उपविजेते पद मिळविले. या स्पर्धेसाठी भव्य दिव्य अशा प्रकारचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेसाठी भव्य अशी ट्रॉफी कैलासवासी बळीराम भरत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ स्वरूप गणेश थळी यांच्याकडून देण्यात आल्या. व द्वितीय क्रमांकासाठी कैलासवाशी काशिनाथ म-या थळी यांच्या स्मरणार्थ स्वरूप गणेश थळी यांच्या कडून देण्यात आले आणि इतर पारितोषिकेत सुद्धा या नवयुवक नवजवान खेळाडूंना देण्यात आले. अशा प्रकारे कडापे येथे नवयुवकांसाठी क्रिकेटची महास्पर्धा मोठया उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धा आयोजनासाठी प्रितम स्पोर्ट्स संघाचे मोलाचे सहकार्य लाभले.