गोंदवले – स्वर्गीय खाशाबा जाधव तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 मध्ये दहिवडी नं.१ च्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सलग दुसऱ्या वर्षी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या स्पर्धेत, 28 किलो वजनी गटात संग्राम अमोल बोडरे (इ.4 थी) याने प्रथम क्रमांक पटकावून सर्वांनाच प्रभावित केले.
त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवडला गेला आहे. दहिवडी नं.१ च्या या यशाबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. मागील वर्षी देखील २५ किलो वजनी गटात संग्रामने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला होता आणि तीच परंपरा त्याने यावर्षीही कायम ठेवली आहे.त्याच्या या यशाबद्दल गटविकास अधिकारी प्रदिप शेंडगे,गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षणविस्तार अधिकारी रमेश गंबरे,नंदकुमार दंडिले केंद्रप्रमुख वर्षा गायकवाड ,मुख्याध्यापिका सुनिता यादव ,शाळा व्यवस्थापन समिती व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले.यासाठी शिक्षिका केशर माने,मनिषा बोराटे,रश्मी फासे व सागर जाधव तसेच पालक रोहिदास चव्हाण व लोखंडे वस्ताद यांनी संग्रामला विशेष मार्गदर्शन केले.