ओडिशामधील राऊरकेला येथे सुरू असलेल्या हॉकी विश्वचषकात भारताने विजयाने सुरुवात केली आहे. सलामीच्या लढतीत भारताने स्पेनवर 2-0 असा विजय मिळवला. भारताकडून अमित रोहिदास आणि हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला.
भारताची पुढची लढत 15 जानेवारीला इंग्लंडशी होणार आहे. अमितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
अन्य सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडवला. अर्जेंटिनाने दक्षिण आफ्रिकेला 1-0 असं नमवलं. इंग्लंडने वेल्सवर 5-0 असा दणदणीत विजय मिळवला.