पिंपळवाडी (पिराची)प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा 

0
फोटो : पैठण : पिंपळवाडी पिराची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.(छायाचित्र : विनायक मोकासे)

पैठण,दिं.७ :पिंपळवाडी(पिराची) ता.पैठण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक आरोग्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

       प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळवाडी येथे शुक्रवार (दिं. ७) एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला, या मधे “सुंदर माझा दवाखाना” मोहिम अंतर्गत आरोग्य केंद्रातील अंतर्गत व बाह्य स्वच्छता,करण्यात आली आरोग्य विषयक माहिती पोस्टर,बॅनर,आरोग्यदायी वृक्षारोपण, रुग्णांना आरोग्य शिक्षण मिळण्यासाठी दृक श्राव्य साधन प्रतिक्षालय कक्षात लावण्यात आले,ग्रामस्थांची सनद ,धूम्रपान करण्यात सकत्त मनाई व दंडत्मक कार्यवाही बाबत फलक , रुग्नास बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे,रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवेबाबत माहिती चे पोस्टर लावण्यात आले तसेच स्वच्छता गृह,भांडार गृह, यांची स्वच्छता करण्यात आली,रुग्ण नोंदणी स्वतंत्र व्यवस्था ,औषधी वितरण कक्षात रूग्नास बसण्याची व्यवस्था करण्यात आली ,”सुंदर माझा दवाखाना”  ही मोहीम ७ एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान आहे,जागतिक आरोग्य दिन हा जगभर साजरा करण्यात येतो जागतिक आरोग्य संघटनेने या वर्षीचे थीम  Health Equity,Health for all हे आहे, जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यासाठी पिंपळवाडी पिराची प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन अवसरमोल, डॉ.गणेश मैंदड  ,आरोग्य सहाय्यक सुभाष थोरात ,आरोग्य सेवक सचिन मुंगिबल्हाल ,आरोग्य सेविका  मोहिनी साठे,सविता जाधव ,लिपिक लक्ष्मण बोबडे  ,रुग्नवाहीका चालक अण्णासाहेब दहिहंडे सह प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here