यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे रुग्णाची कॅन्सरवर यशस्वी मात…!

0

दिगंबर लाठकर यांनी यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद चे डॉ.सोमा श्रीकांत व डॉ. भारत वासवानी यांचे मानले आभार…!!!

नांदेड – प्रतिनिधी

येथील रुग्ण दिगंबर लाठकर यांना ऑगस्ट २०२३ दरम्यान मुख जिभेवर कर्करोगाचे निदान नांदेड येथील कान,नाक,घसा तज्ञ डॉ.सुभाष कोमावार यांच्याकडे झाले त्यानंतर डॉ. कोमावार यांनी सदरील रुग्णास पुढील उपचारांसाठी सिंकदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. भरत वासवानी यांच्याकडे संदर्भित केल्यानंतर मुख कर्करोगाची पुष्टी झाल्यानंतर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादचे सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ.सोमा श्रीकांत यांनी अतिशय उत्कृष्टरीत्या शस्त्रक्रिया करत रुग्णाचा कर्करोग ग्रस्त भाग काढून टाकला तसेच त्या भागावर चे रेडिएशन पण पूर्ण झाले एकंदरीत सर्व सुविधा एकाच हॉस्पिटलमध्ये मिळाल्यामुळे दिगंबर लाठकर यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

आज या संपूर्ण गोष्टीला एक वर्ष पूर्ण झाले असून रुग्ण दिगंबर लाटकर हे अतिशय आरोग्यदायीरी्या आयुष्य जगत आहेत त्यांनी डॉक्टरांनी केलेल्या शस्त्रक्रियेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करत यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे कार्यरत असलेले असिस्टंट मॅनेजर किरण  बंडे यांनी दिगंबर लाठकर यांना केलेल्या विशेष सहकार्याबद्दल त्यांचे श्री लाठकर यांनी आभार मानले. 

त्यां

च्या या डॉक्टर कृतज्ञते बद्दल सर्व समाज बांधवाकडून कौतुक करण्यात येत आहे.सदर रुग्ण दिगंबर लाठकर यांचे हेल्थ इन्शुरन्स असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण आली नाही व सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट.डॉ. सोमा श्रीकांत यांची नांदेड येथे दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी व्हिजीट असते. तसेच मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. भरत वासवानी यांची व्हिजीट ही दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी असते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here