कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना एमआयडीसी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांमुळे मिळाले जीवदान

0

पैठण,दिं.२८:बालानगर परिसरातुन गोवंश प्राण्यांची कत्तलीसाठी तस्करी करणारी टोळी एम.आय.डी.सी.पोलीसांनी जेरबंद केली.

बालानगर येथे रविवारी रात्री दोन वाजेच्या दरम्यान एका पिकअप वाहनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे घालुन गोवंश प्राण्यांची कत्तलखान्यात नेण्यात येत असल्याची माहीती मिळाली होती.पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ.विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,उपनिरीक्षक नामदेव कातडे, पोलिस जमादार राजेश चव्हाण,कर्तारसिंग सिंगल, गोपाळ घारे यांच्या पथकाने सापळा रचून बालानगर परिसरातून आठ मोठे,एक लहान अशा एकूण नऊ गोवंश जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करतांना शेख अजगर शेख मुख्तार रा.इंदिरानगर गारखेडा,शेख अरबाज शेख अहमद रा.छावणी छत्रपती संभाजीनगर, नावेद कुरेशी रा.बालानगर ता.पैठण यांना ताब्यात घेऊन पैठण न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली पुढील तपास एम.आय.डी.सी.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे,पोलीस उपनिरीक्षक नामदेव कातडे, पोलिस जमादार राजेश चव्हाण,कर्तारसिंग सिंगल, सहाय्यक फौजदार बाबासाहेब दिलवाले हे करीत आहे.

——

प्रतिक्रिया

भागवत नागरगोजे (सपोनि एम आय डी सी पैठण) : गोवंश कत्तलसाठी काही गाईसह बैल,छोटे वासरे घेऊन जात असल्याची माहिती मला मिळताच रात्री तीन वाजता बालानगर गावातुन एका बोलेरो पिकप वाहनातून जात असताना मी व माझ्या सहकाऱ्यांनी तात्काळ ते वाहने पकडून एकदा तासांतच मुक्या जनावरांना मुक्त करून गौशाळेत दाखल केले व आरोपीवर गुन्हा दाखल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here