सातारा : पाटखळ माता येथील कन्हेर डाव्या कॅनॉलमध्ये मिळून आलेल्या बेवारस पुरुष जातीच्या प्रेताची ओळख पटवून त्यावरून खुनाचा गुन्हा उघडकीस आणून तीन संशयीताना सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली.सातारा तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्तीत कारवाईला यश आले आहे.
पाठखळ माथा ता.जि. सातारा येथून दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कन्हेर डाव्या कॅनॉलमध्ये एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह मिळून आले होते. त्यास अनुसरून सातारा पोलीसत अकस्मात मयत तक्रार नोंद करण्यात आली होती. त्यानंतर सदर प्रेताचे सातारा सिव्हिल हॉस्पिटल मध्ये फॉरेन्सिक तज्ञ डॉक्टर राहुल खाडे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हिरास यांनी पोस्टमार्टम केले. सदर मयतेतील अनोळखी पुरुष जातीच्या प्रेताचे दोन्ही पाय बांधले असल्याने, सदर प्रकार घातपाताचा असल्याची शंका आल्याने सदर मयताची ओळख पटवणे महत्त्वाचे होते वरिष्ठाच्या सांगण्यानुसार पथक तयार करून गोपनीय माहितीनुसार तपास शोध घेतला.व मयताची ओळख पटवली असता, सदरचे प्रेत हे खेड तालुका जिल्हा सातारा येथील शरद मधुकर पवार यांचे असल्याचे तपासामध्ये सिद्ध झाले. सदर पोलिसांनी मयताचा घातपात केले बाबत,गोपनीय माहिती प्राप्त केली असता शरद पवार यांचे बावधन येथील महिलेशी प्रेम संबंध असल्याची माहिती प्राप्त झाली. तसेच मयत शरद पवार व नेले केडगाव तालुका जिल्हा सातारा येथील संशयिकाची काही दिवसांपूर्वी भांडणे झाले असल्याची माहिती समोर आली त्यानुसार सातारा पोलिसांनी संशयीताना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर मताच्या अनुषंगाने चौकशी केली असता, संशयीतानी मयत शरद मधुकर पवार वय 37 वर्ष राहणार खेड तालुका जिल्हा सातारा वाडे गावच्या हद्दीमध्ये दिनांक पाच ऑगस्ट रोजी खून करून जवळच असलेल्या कन्हेर डाव्या कॅनॉलमध्ये टाकून दिले असल्याची कबुली दिली. त्यानुसार मयताच्या चौकशीवरून व तपासावरून सातारा पोलीस स्टेशन मयत शरद मधुकर पवार याचा खून केले बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुण्याच्या तपासामध्ये एकूण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी, किरणकुमार सूर्यवंशी, सातारा शहर विभाग सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी,अमित पाटील, सातारा येथील विविध शाखांचे पोलिसांनी या तपास कामी भाग घेतला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके करीत आहेत सदर या कारवाईमुळे व खुनाचा तपास तातडीने केल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.