अकोला :- शासकीय प्रणालीचा तांदूळ अवैधरित्या खुल्या (काळ्या )बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणार ट्रक ताब्यात घेऊन ५ लाख ३ हजार ८८० रुपयांचा २९६ क्विंटल तांदूळ व ट्रक असा एकूण २५ लाख ३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ट्रकचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मूर्तिजापूर एम.आय . डी . सी . परिसरात केली आहे.
या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखेला मुर्तीजापुर शहरातील एम.आय.डी. सी.मधील खासगी गोडानातून शासकिय धान्य वितरण प्रणालीतील तांदुळ हे धान्य खेडया पाडयावरून किरकोळ खरेदी करून खुल्याबाजारात विक्री साठी जात असल्याची माहीती मिळाली त्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभागाने प्लॉट क्र. बी ४३ मधील खासगी गोडावुन मधुन ट्रक क्रमांक एम . एच . २७ बी . एक्स ३२११ मध्ये शासकिय वितरण प्रणाली मधील तांदुळ भरून खुल्या बाजारात विक्री करीता जात असताना रंगेहाथ पकडून आरोपी आसीफ उर्फ नसीब खान (वय २१ वर्षे) रा.जुनी वस्ती मुर्तीजापुर याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळून ५ लाख ३ हजार ८८० रुपयांचा २९६ क्विंटल तांदूळ व ट्रक असा एकूण २५ लाख ३ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.ट्रक चालक, मालक व इतर यांचे विरुध्द कलम ७ ( ३ ) इ.सी. अॅक्ट प्रमाणेमूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधिक्षक संदीप घुगे,अप्पर पोलीस अधिक्षक मोनिका राउत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले,सहा.पोलिस निरीक्षक महेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव,यांच्या सह पोलीस कर्मचारी, व मूर्तिजापूर येथील महसूल विभागाने केली आहे.