कासवंडमधील रिसॉर्टवर ‘छमछम’; चार युवतींसह पाच डॉक्टर, फार्मासिस्टला अटक

0

पाचगणी : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील स्प्रिंग रिसॉर्टवर ‘छमछम’ सुरू असतानाच पोलिसांनी छापा टाकून चार युवतींसह सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर, मिरजमधील एक व पुण्याचे फार्मासिस्ट असे एकूण आठ जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी डॉ. मनोज विलास सावंत (रा. दहिवडी), डॉ. राहुल बबनराव वाघमोडे (रा. दहिवडी), डॉ. निलेश नारायण सन्मुख (रा. मिरज), डॉ. रणजीत तात्यासाहेब काळे (रा. दहिवडी), डॉ. महेश बाजीराव साळुंखे (रा. मलकापूर, कराड), डॉ. खाडे (सातारा), डॉ. प्रवीण शांताराम सौद (रा. पुणे, फार्मासिस्ट) या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, थंड हवेचे ठिकाण असलेल्या पाचगणी कासवंड गावातील स्प्रिंग रिसॉर्टमधील एका हॉलमध्ये सांगली-पुण्यातून चार नर्तिका आणण्यात आल्या असून, त्या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती साताऱ्याच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑंचल दलाल यांना मिळाली. या माहितीवरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आले.

घटनास्थळावर पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्टच्या तळमजल्यावर सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज व पुण्यातील तिघे असे सात ते आठ जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर मद्य पिऊन झिंगत असतानाच पोलिसांना रंगेहात सापडले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला, सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट, रिसॉर्ट चालक शिर्के अशा एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई केली आहे. पाचगणी पोलीस पोलिस ठाण्यात गन्हा नोंदविण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here