चोपडज तालुका बारामती येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस, 

0

स्थानिक गुन्हे शाखा व वडगाव निंबाळकर पो.स्टे. ची संयुक्त कारवाई. 

बारामती: वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीत मौजे चोपडज, ता. बारामती, जि. पुणे येथे दिनांक २८/११/२०२२ रोजी रात्री ०२.०० वा. चे सुमारास फिर्यादीचे राहत्या घरात अनोळखी चोरट्यांनी येऊन फिर्यादीची घराचे पाठीमागील सेफ्टी दरवाजाचे आतील कडी काढून घरात प्रवेश करून बेडरुममध्ये येवुन एक उंच असलेल्या आरोपीने फिर्यादीचे तोंड हाताने दाबुन चाकूचा धाक दाखवून तुम चुप रहो आपके पास जो है वह दे दो असे हिंदीत बोलून दुसरे आरोपीने फिर्यादीचे गळ्यातील तीन तोळा वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र जवरदस्तीने कटरने कापून घेवून व दोन्ही हातातील ५ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या काढून बेडरुममध्ये असलेले लोखंडी कपाटातील हिरे, सोन्याचे व चांदीचे दागिने व रोख रक्कम ८५ हजार रुपये असा एकुण १०,७७,५००/- किमतीचा माल जबरदस्तीने चोरी करून चोरून नेला होता याबाबत वडगाव निबाळकर पोलीस स्टेशन येथे गु. रजि.नं. ४१५/२०२२, भा.दं.वि कलम ३९२,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरीता पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण अंकित गोयल सो, अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग आनंद मोईटे, उप विभागीय पोलीस अधिकारी, बारामती विभाग गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण अविनाश शिळीमकर व वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पो.स. ई. अमित सिद-पाटील, सहा फौज, रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे, पो. हवा. स्वप्निल अहिवळे, अभिनीत एकशिंगे, सचिन घाडगे, राजू मोमीन, विजय कांचन, आसिफ शेख, सहा फौज काशीनाथ राजापुरे, वडगाव निबाळकर पो.स्टे. कडील पोहवा. सूर्यकांत कुलकर्णी, पो.ना. हिरामण खोमणे, भाउसाहेब मारकड, पोको पोपट नाळे, अमोल भुजबळ, नामदेव साळुंके यांची संयुक्त पथके तयार करून त्यांना गुन्हा उघडकीस आणण्याच्या सुचना दिलेल्या होत्या.

गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांना पुढे होते त्याकरीता पोलीस पथकाने गोपनीय बातमीदारामार्फत बातमी काढली असता सदरचा गुन्हा हा संदिपान झुनझुन्या भोसले त्याचे टोळीतील सदस्याने केला असल्याची माहिती मिळाल्याने आरोपी नामे १) संदीपान झुंझून्या भोसले, रा. पिंपळी, ता. बारामती, जि. पुणे, २) शरद झुनझुन्या भोसले, मूळ रा. पिपळी, ता. बारामती, जि. पुणे. सध्या रा. काडी, ता. दौड जि.पुणे, ३) अमोल नहाना काळे, रा. पोबलवाडी, ता. करमाळा, जि. सोलापूर, ४) रितेश अर्जुन काळे, रा कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे, ५) पांड्या उर्फ पांडुरंग गोरख उर्फ गोरया भोसले वय २५ वर्ष मूळ रा टाकली, ता. करमाळा, जि. सोलापूर, सध्या रा. कासुर्डी, ता. दौड, जि. पुणे यांना ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला आहे. त्यांचे ३ साथिदारांचा शोध चालु आहे. सदरचा गुन्हा हा पाच पेक्षा जास्त आरोपींनी केलेला असल्याने गुन्हयास दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपीकडून गुन्हयात गेले मालापैकी सोन्याचे कानातील टॉप्स व चांदीच्या पट्ट्या जप्त करण्यात आलेल्या असून गुन्हयात वापरलेली होंडा कंपनीची युनिकॉन मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे ती सध्या आरोपींनी चोरून आणलेली असून त्याबाबत तपास चालू आहे. गुन्हयातील आरोपींना दिनांक ०५/०१/२०२३ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेली असून गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here