कामगार गंभीर जखमी; डोक्याला पडले तब्बल ६२ टाके ,पोलिसांकडून तीनही आरोपींना अटक
जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड शहरातील खर्डा रोडवरील चालू असलेला बर्फाचा कारखाना बंद पाडण्याच्या कारणावरून बर्फ कारखान्यात कामाला असलेल्या कामगारावर तीन जणांनी दगडाने हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये कामगार गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्यावर ६२ टाके पडले आहेत. पोलिसांनी तीन आरोपींनवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या तीनही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीसांन कडुन मिळालेली माहिती अशी की विजय ओमप्रकाश चौरासिया वय-३२ वर्ष धंदा-मजुरी रा. पडरोना, जिल्हा कुसीनगर (राज्य उत्तरप्रदेश) हल्ली रा. महावीर बर्फ कारखाना, खर्डा रोड, जामखेड हा सुमारे ८ वर्षापासुन जामखेड येथील खर्डा रोडवरील दिलीप फुलचंद गांधी यांच्या महावीर बर्फ कारखान्यामध्ये कामाला आहे. दि ६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वा. सुमा. खर्डा रोडवरील बर्फ कारखान्यामध्ये एकटाच काम करत असताना याठिकाणी आरोपी सुरेश आप्पा क्षीरसागर, शुभम अमृत पिंपळे, दोघे रा. आरोळे वस्ती व मनोज सुरेश जगताप रा. म्हाडा कॉलनी जामखेड हे तीघे जण त्या ठिकाणी आले.
या तिघांनी काही एक कारण न सांगता शिवीगाळ करुन त्यांच्या हातातील दगडाने फीर्यादीस पायाच्या नढगीवर व डोक्यात जिवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करु लागले. यावेळी सुरेश आप्पा क्षीरसागर हा म्हणत होता की याचा पाय तोडा जेणे करुन हा काम करणार नाही व कारखान बंद पडेल असे म्हणुन वरिल तिघांनी फीर्यादीस डोळ्याच्या मागील बाजुस व डाव्या पायाचे नढगीवर दगडाने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाण करतांना फीर्यादी मोठमोठ्याने ओरडत असल्याने तेथे जवळ असलेले साई ट्रन्सफॉर्म या दुकानातील मॅनेजर महेश कसबे व अरुण देवकाते हे त्या ठिकाणी आले.
यावेळी आरोपींनी त्यांच्यावरही दगडफेक करून आरोपी तेथुन पळुन गेले. त्यानंतर महेश कसबे यांनी कारखान्याचे मालक दिलीप फुलचंद गांधी यांना सदरचा प्रकार सांगितला. त्यानंतर गांधी यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना सदरची माहिती दिली व कोठारी यांनी ही माहिती पोलिस निरीक्षक महेश पाटील यांना दिली. यानंतर पोलिसांनी तितडीने रुग्णवाहिका बोलावून शहरातील समर्थ हॉस्पिटल या खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. मारहाणीत डोक्यात मागील बाजुस ६२ टाके पडले व डावा पाय फ्रैक्चर झाला आहे.
उपचारा दरम्यान पुर्ण शुध्दिवर आल्यानंतर पोलिसांना फीर्यादी यांनी जबाब दिला. त्यानुसार सुरेश आप्पा क्षीरसागर, मनोज सुरेश जगताप, शुभम अमृत पिंपळे या तिघांवर जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांनी तीघांनही आरोपींना तात्काळ अटक केली आहे. भांडणाचे मूळ कारणांचा शोध पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस करत आहेत.