दहिवडी : गोंदवले बुद्रुक (ता. माण) येथील माणगंगा नदी किनारी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दहिवडी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत रोख रक्कम, जुगार साहित्यासह ४० हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दत्तात्रय अशोक रणपिसे, रितेश अशोक कट्टे, विशाल रामचंद्र रणपिसे, धनाजी शंकर अवघडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. तर नंदकुमार सदाशिव अवघडे, अनिल बापूराव रणपिसे, अजित उत्तम शिंदे, शिवाजी संभाजी रणपिसे हे चौघे पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले. ही कारवाई सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अरुण दुबळे, पोलीस नाईक नीलम रासकर, पूनम रजपुत,रामचंद्र गाडवे यांनी केली.