देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे शनिवारी सायंकाळी मुलीस फुस लावून पळून नेल्याने दोन गटात धुमचक्री झाली.एका गटाने दगडफेक केल्याने किराणा दुकानाच्या काचा फुटीसंदर्भात ल्या आहेत.तर लक्ष्मण म्हस्के यांच्या मोटारसायकलवर दगड घालुन नुकसान केले होते. रविवारी राञी तीच मोटारसायकल अज्ञात व्यक्तीने जाळून टाकली आहे.या घटनेला वेगळे वळण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शनिवारी सायंकाळी दोन गटात झालेल्या धुमचक्री नंतर राहुरी पोलिस ठाण्यात परस्परां विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.१२ जणा विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत.एका गटा विरोधात जाती वाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शनिवारी राञी दोन्ही गटा विरोधात गुन्हे दाखल केल्या नंतर यातील एका गटातील सहा जणांना अटक करण्यात आली आहे.अटक करण्यात आलेल्यामध्ये लक्ष्मण उत्तम म्हस्के,विकी अशोक म्हस्के, शुभम सुरेश चव्हाण,राहुल अशोक इंगवले, दिपक लिंबाजी इंगवले,अजय अशोक इंगवले (सर्व रा. इनामवस्ती, देवळाली प्रवरा ता. राहुरी) समावेश आहे.तर दुसऱ्या गटातील सहा जणावर गुन्हा दाखल झाला.त्यामध्ये बाबासाहेब पवार उर्फ रोंग्या, प्रशांत म्हस्के उर्फ परशा,निखील दिलीप धोत्रे,विजय बाळु इथापे उर्फ खंड्या,अनिल बाळु इरले उर्फ खली,आंबादास इरले उर्फ काळु (सर्व रा. देवळाली प्रवरा ता. राहुरी) आदी हे सर्वजण फरार झाले आहेत.
रविवारी राञी अज्ञात व्यक्तीने या घटनेतील मोटारसायकल पेट्रोल टाकुन जाळण्यात आल्याने या घटनेला वेगळे वळण लागले आहे.राहुरी पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याशी भ्रमणभाष वरुन संपर्क साधला त्यांच्या सहकाऱ्यांनी साहेब कामात आहे.असे सांगुन माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली.मोटारसायकल जाळल्यानंतर स्वतंञ गुन्हा दाखल केला की! दाखल गुन्ह्यात कलम वाढविण्यात आले हे माञ समजु शकले नाही.
देवळाली प्रवराची कायदा सुव्यवस्था बिघडली आहे.येथे स्वतंञ पोलिस चौकी असतानाही गेल्या दोन वर्षा पासुन हि पोलिस चौकी बंद आहे.या पोलिस चौकी सहा ते सात पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली असतानाही एक हि पोलिस कर्मचारी या पोलिस चौकीकडे फिरकत नाही.