येवला प्रतिनिधी
पानबुडी मोटार चोरी प्रकरणी येवला तालुका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळवाडे येथील शेतकरी अनिस अय्युब पटेल यांच्या शेतातील गट नंबर 126/3 मधील पानबुडी मोटार चोरी गेल्याने पोलिसात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. आज दुपारी पावसाचे सावट असल्याने स्टार्टर झाकण्या साठी शेतावर गेले असता ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी पानबुडी मोटार वर डल्ला मारल्याचे निदर्शनास आले आहे.गेल्या काही दिवसा पासून विहिरीतील मोटार चोरी करणारे रॅकेट येवला तालुक्यात सक्रिय असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी चोरी जाण्याचे प्रकार घडले आहेत. मात्र या प्रकरनात चोरांचा छडा लावण्यास अद्याप पोलिसांना फारसे यश आले नसल्याचे बोलले जात आहे.
पाणबुडी मोटारी चोरीची प्रकरने तालुक्यात वाढल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे कारण आधीच शेतकरी वर्ग पिकाला भाव नसल्याने मेटाकुटीला आला आहे वरून अवकाळी पावसाचे संकट शेतकऱ्यावर घोंगावत आहे त्यातच तालुक्यात पाणबुडी मोटर चोरीला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे मात्र पोलीस प्रशासन फक्त बघ्याची भूमिका घेत आहे
प्रतिकिर्या *
यापूर्वी येवला तालुका पोलीस स्टेशनला पाणबुडी मोटार चोरीची अनेक गुन्हे दाखल झालेले परंतु सदर गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी अद्याप एकही आरोपीला अटक केलेली नाही किंवा एकही गुण्याचा छडा लावलेला नाहीये यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे
*अनिस पटेल शेतकरी तळवाडे*