बनावट धनादेश देत फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिन्याचा कारावास

0

कोपरगाव : बनावट धनादेश देत फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिन्याच्या कारावास आणि भरपाई म्हणून दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली . याबाबत अधिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील रहिवाशी फिर्यादी सुनिल गणेश रत्नपारखी रा.भारत प्रेस रोड कोपरगाव यांचे व आरोपी सत्यनारायण त्रिनाथ बेहरा रा. निमगाव कोऱ्हाळे शिर्डी ता- राहाता यांच्या मध्ये मैत्रीचे संबंध होते. या मैत्रीचे संबंधा मध्ये फिर्यादी सुनिल गणेश रत्नपारखी यांनी आरोपी सत्यनारायण त्रिनाथ बेहरा यांना हात उसने रक्कम रुपये १,२५,०००/- वेळो वेळी दिले होते. त्यापैकी रक्कम रुपये ६०,०००/- धनादेश पार्टली पेमेंट म्हणून दिलेला होता. परंतु सदर धनादेश न वटल्यामुळे वारंवार त्यांना सांगून देखील त्यांनी हात उसने रक्कमेची परतफेड केली नाही. म्हणून सुनिल गणेश रत्नपारखी यांनी धनादेश न वटल्या प्रकरणी कोपरगाव येथील फौजदारी न्यायालयात केस दाखल केली होती.

सदर केसचे कामकाजात चौकशी अंती आरोपी सत्यनारायण त्रिनाथ बेहरा रा. निमगाव कोऱ्हाळे शिर्डी ता- राहाता हे दोषी आढळल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा शाबित होऊन कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एम. ए. शिलार यांनी आरोपीस ६ महिने साधे कारावासाची शिक्षा व ७०,०००/- रुपयाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. सदर नुकसान भरपाई देण्यास कसूर केल्यास आरोपीस पुन्हा १५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. याकामी फिर्यादी सुनिल गणेश रत्नपारखी यांच्या वतीने अ‍ॅड. बी.ए. सोनवणे कोपरगाव यांनी काम पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here