भावाला मारहाण का केली म्हणून जाब विचारण्याच्या रागातून तलवारीने हल्ला दोन जखमी 

0

पैठण,दिं.२५ : पैठण तालुक्यातील  नारायणगाव येथे भावाला मारहाण का केली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्यावरती तलवारीने हल्ला दोन जखमी .नारायणगाव ता.पैठण येथे रविवार.२३ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मारहाण का केली म्हणून जाब विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादी व अन्य एक जणास तलवारीने मारहाण करीत गंभीर जखमी केल्याची घटना रविवार रोजी नारायणगाव परिसरातील शेत वस्तीवर घडली  या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींना तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे .

   या बाबत एमआयडीसी पैठण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दिं.२३) रोजी  ११ वाजेच्या सुमारास नारायणगाव शेत वस्तीवर  फिर्यादी आदिनाथ गवळी यांच्या चुलत भावास आरोपी संतोष गवळी,दशरथ गवळी दोन्ही रा.नारायणगाव ता.पैठण यांनी मारहाण केली होती त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व प्रवीण गवळी गेले असता त्यांचात वाद होऊन जोरदार भांडणे झाले. यावेळी आरोपींनी तलवारीने आणि काठीने मारहाण केली .या दोघांना गंभीर जखमी केले या प्रकरणी पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यास माहिती मिळताच घटनास्थळी पैठण पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल नेहूल सपोनि भागवत नागरगोजे, पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमी झालेल्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले .  गुन्ह्यातील तलवार जप्त करीत या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पैठण न्यायालयाने  आरोपींना  तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे . याबाबत पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास उपविभागीय अधिकारी डॉ . विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि भागवत नागरगोजे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे  ,राहुल मोहतमल , अंकुश रहाटवाड , बापते ,मिलिंद घाटेश्वर करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here