रमाई जयंतीचा फलक पुन्हा एकदा फाडला; कोपरगावमध्ये तणावाचे वातावरण

0

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव मध्ये माता रमाई जयंती निमित्त लावलेले शुभेच्छा फलक काही सामाज कंटकांनी फाडल्याने शहरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते . फलक फाडल्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहर बंद ठेवण्यात आले होते. संतप्त समाजाच्या भावना बघता पोलीस यंत्रणेचेही चांगलीच धावपळ उडाली होती. संतप्त नागरिकांनी नगर-मनमाड महामार्ग तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्माराकाजवळील दोन्ही मार्ग रोखत रस्ता रोको आदोलन करत बंद केले. होते. शेवटी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना दोन दिवसात आरोपींना पकडण्याचे आश्वासन दिल्या नंतर आंदोलकांनी आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

याबाबत अधिक माहिती अशी की माता रमाई जयंती निमित्त कोपरगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी शुभेछाचे फलक लावण्यात आले होते. आज दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी धरणगाव रस्त्यावरील तीन फलक काही सामाज कंटकांनी फाडल्याचे लक्षात आले . दोनच दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज स्मारकाजवळील रामी जयंतीचा फलक फाडला होता. त्यावेळीही आंबेडकरी जनता आंदोलनाच्या पवित्र्यात होते मात्र पोलिसांच्या आश्वासनानंतर गुन्हा दाखल करून आंदोलन थांबवले होते. मात्र आज पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती झाल्याने शहरामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी अत्यंत सामंज्यसाची भूमिका घेत या प्रकरणाचा जलद गतीने तपास करून दोन दिवसात आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. यानंतर आंदोलकानीही आपले आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे जाहीर केले. मात्र यानंतरही आरोपी पकडण्यास पोलिसांना अपयश आल्यास राज्य पातळीवर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here