केदारखेडा : वाघ्रुळ- जालना तालुक्यातील वाघ्रुळ या गावामध्ये रहिवासी असलेल्या गंगा सोमनाथ हारणे या महिलेस व्यक्तिक वादावरून दीपक सीताराम तिडके ,शांताबाई तिडके ,योगिता तिडके या तिघांनी सदरील महिलेस लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी, देऊन त्या महिलेवर प्राणघातक हल्ला केला. सदरील महिला ही जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहे. या तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाणे जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिन्ही आरोपीस योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी सदरील महिलेची आहे.