वाठार स्टेशन : वाठार स्टेशन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून 16 वर्षांच्या मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून 16 वर्षीय मुलीचे मंगळवारी (दि.2) दुपारी 2 ते 3 च्या सुमारास घराच्या परिसरातून अज्ञाताने अपहरण केले.
कुटुंबीयांनी नातेवाइकांकडे चौकशी आणि इतर ठिकाणी तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे तिच्या वडिलांनी काल (दि. 6) फिर्याद दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक संदीप बनकर तपास करत आहेत.