विजपंप चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी निघाले मोटारसायकल चोर 

0

राहुरी पोलिसांनी  11 मोटरसायकल केल्या हस्तगत ;खोटी नंबर प्लेट बनविणाऱ्या  रेडियम दुकानदारास अटक

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

                जातप ता.राहुरी येथिल शेतकऱ्यांच्या शेत तळ्यावरील विजपंप चोरी करताना रंगेहाथ पकडलेल्या तीन आरोपींनी राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील  मोटारसायकल चोरीचे गुन्हे केल्याचे तपासा दरम्यान उघड झाले.राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातून 11 मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.राहुरी 11 मोटारसायकली जप्त केल्या असुन बनावट नंबर प्लेट बनविणाऱ्या रेडीअम दुकानदारास पोलिसांनी अटक केली असल्याने या गुन्ह्यात एकुण चार आरोपी झाले आहेत.

                  राहुरी तालुक्यात  गेल्या काही दिवसापासून राहुरी शहर व इतर ठिकाणाहून मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढले होते.जातप.ता.राहुरी येथिल सुभाष गल्हे यांच्या शेत तळ्यावरील विज पंप चोरी करताना रंगेहाथ पकडले. पोलिसांनीही विजपंप चोरीतील तीन जणांना अटक केल्या नंतर गुन्हे शाखेच्या पथक मोटरसायकल चोरणाऱ्या टोळीचा शोध घेत होते. त्यावेळी त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमिदारा मार्फत मिळालेल्या माहिती वरुन अटक केलेले तीन आरोपींना संशयीत म्हणून  चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. परंतु खात्रीशीर खबर असल्याने अधिक चौकशी पोलिस खाक्या दाखवताच दोन मोटारसायकल चोरीची कबुली दिली.या गुन्ह्यातील नावेद इब्राहिम शेख वय 23 (रा जातप ता राहुरी),मंगेश विष्णू ठाकर वय 22 (रा-सोमय्या फार्म ता. राहुरी) या दोघांना चोरलेली मोटारसायकल किशोर अंकुश पवार वय 19 (रा.उंदीर गाव ता.श्रीरामपूर ) त्याच्याकडे दिलेली असल्याचे सांगितले.किशोर पवार यास त्यालाही अटक केली.तपासादरम्यान एकूण दोन मोटसायकल जप्त करण्यात आल्या.आरोपी  नावेद इब्राहिम शेख  याने देवळाली प्रवरा व टाकळीमिया या ठिकाणावरून अजून दोन  मोटरसायकल चोरल्याची  कबुली दिल्याने  त्यास न्यायालयाकडून राहुरी पोलीस स्टेशन गुरं न 603/24 मध्ये वर्ग करून तपास करत असताना राहुरी पोलिसांनी  11  मोटरसायकल जप्त करून राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील  व श्रीरामपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 11 गुन्हे उघडकिस आणले आहे. 

                सदर गुन्ह्यातील तीन ही आरोपींनी चोरलेल्या मोटरसायकलवर राहुरी फँक्टरी येथिल कलर्स रेडियमचे चालक जावेद रज्जाक शेख (रा.संक्रापूर ता. राहुरी) याच्याकडून बनावट नंबर प्लेट लावून विल्हेवाट लावल्याची कबुली दिल्याने व नंबर प्लेट लावताना सदर गाडी चोरीची  असून तीचे कागदपत्राची कुठलीही खातरजमा न करता नंबर प्लेट लावल्याने आरोपी जावेद रज्जाक शेख यास अटक करण्यात आली.

            नावेद इब्राहिम शेख व जावेद रज्जाक शेख  या दोघांनाही मान्य न्यायालयापुढे हजर करुन पोलीस कस्टडीची मागणी केली असता सरकारी अभियोक्ता अँड गागरे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड  मिळविला.पोलीस कस्टडी दरम्यान आरोपी नावेद इब्राहिम शेख याने अजून नऊ मोटरसायकल चोरल्याची कबुली देवून तपासा दरम्यान सर्व मोटारसायकली काढुन दिल्या.

               सदर कारवाई पोलिस अधीक्षक  राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक वैभव कुलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संजय आर.ठेंगे, सहायक पुलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, रवींद्र पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, धर्मराज पाटील,सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते,पो.हे.कॉ. सुरज गायकवाड, संदिप ठाणगे, पो.ना. प्रविण बागुल, पो.काँ. प्रमोद ढाकणे, नदीम शेख,सचिन ताजणे, गोवर्धन कदम,जयदीप बडे, अजिनाथ पाखरे,सतीश कुऱ्हाडे,अंकुश भोसले, आजिनाथ पाखरे मोबाईल सेल श्रीरामपुरचे पो.ना.सचिन धनाड,संतोष दरेकर यांनी केली आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार विष्णू आहेर हे करीत आहे. 

.……. त्यांनी पोलिसांना माहिती द्यावी.

       राहुरी पोलिसांच्या वतीने नंबर प्लेट बनवणाऱ्या व्यावसायिकांना आव्हान  करण्यात येते की आपल्याकडे कोणताही ग्राहक वाहनावर नंबर प्लेट बसविण्यास आला असता सदर वाहनाचे आरसी बुक, चेसी नंबर,  इंजिन नंबर याची तपासणी करून खात्री करून नंबर प्लेट बसवाव्या. यामुळे तुमचा गुन्ह्यात सहभाग राहणार नाही. चोरीच्या मोटरसायकल वर कुणी बनावट नंबर प्लेट बसवित असाल्याचा संशय आल्यास तात्काळ राहुरी पोलिसांशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here