विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल

0

संगमनेर : तू आम्हाला गाळा घेण्यासाठी तुझ्या आई वडिलांकडून पैसे घेऊन आली तर नांदायला ये असे म्हणून लाथाबुक्याने मारहाण करत विवाहितेचा गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांनी विवाहितेच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.                  याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी सानिया नजर पठाण रा.हाजीनगर, कोल्हेवाडी रोड संगमनेर हिने शहर पोलिसात फिर्याद दिली असून या फिर्यादीत तिने म्हटले आहे की, रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरी हाजीनगर, कोल्हेवाडी रोड संगमनेर येथे तिचा पती नजर रियाज पठाण, दीर अजहर रियाज पठाण, सासरा रियाज ताजखान पठाण, सासू अरिफा रियाज पठाण सर्व रा. हाजीनगर, कोल्हेवाडी रोड संगमनेर यांनी फिर्यादी सानिया पठाण हिला तू आम्हाला गाळा घेण्यासाठी तुझ्या आई-वडिलांकडून पैसे घेऊन आली तर नांदायला ये असे म्हणत सानियाला लाथा बुक्क्याने मारहाण करून तिच्या गळ्यातील ओढणीने गळा आवळून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. सानिया पठाण हिच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तिच्या सासरच्या मंडळी विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १०४८/ २०२२ भा.द.वि कलम ३०७, ४९८ (अ) ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे दाखल केला असून अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बारकू जाणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here