वृद्ध दाम्पत्याचा खून करून चोरी करून फरार आरोपीस बिडकीन पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

0

बिडकीन / पैठण : १७ डिसेंबर रोजी भिमराव रामराव खरनाळ वय ६५ वर्ष व आई सौ. शशिकला भिमराव हरनाळ वय ६० वर्ष या वृद्ध दाम्पत्याचा पोलीस ठाणे बिडकीन हद्यीतील फारोळा येथे अज्ञात व्यक्तीने खून करून चोरी केल्याची घटना घडली होती. याबाबत पोलीस सूत्रांनी तात्काळ तपास करत आसेफ शब्बीर सय्यद रा. लिहा जहांगिर ता. फुलंब्री जि. औरंगाबाद ह.मु. फारोळा झोपडपट्टी ता. पैठण
जि. औरंगाबाद येथून बेड्या ठोकण्याची कारवाई केली.

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की भिमराव रामराव खरनाळ वय ६५ वर्ष व आई सौ. शशिकला भिमराव हरनाळ वय ६० वर्ष यांचा खून झाला होता. त्याबाबत दिनांक १८/१२/२०२२ रोजी किशोर भिमराव खरनाळ वय ३४ वर्ष, व्यवसाय हॉटेल मालक रा. फारोळा तांडा ता. पैठण जि. औरंगाबाद यांनी पोलीस ठाणे बिडकीन येथे फिर्याद दिली की, दिनांक १७/१२/२०२२ रोजीचे रात्री ११:०० ते दिनांक १८/१२/२०२२ रोजी सकाळी ०९:३० वाजताचे दरम्यान त्यांचे वडिल भिमराव रामराव खरनाळ वय ६५ वर्ष व आई सौ. शशिकला भिमराव हरनाळ वय ६० वर्ष यांचा कोणीतर अज्ञात इसमाने खुन करुन आईचे गळयातील सोन्याचे डोरले, कानातील सोन्याचे झुंबर, सोन्याची कुडके तसेच पायातील चांदीचे पैजन, चांदीचे जोडवे चोरुन नेले. असल्याची फिर्याद दाखल केली होती त्यानुसार पोलीस ठाणे बिडकीन येथे गु.र.नं ५६२ / २०२२ कलम ३०२, ४६० भा.दं.वि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलं होता . सदर गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास व पोलीस ठाणे बिडकीन येथील पथकास गुन्हयाचे तपासकामी सुचना व मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे व पोलीस ठाणे बिडकीनचे पथक तपास करीत असतांना त्यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरुन खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा पोलीस रेकॉर्डवरिल सराईत गुन्हेगार आसेफ शब्बीर सय्यद रा. लिहा जहांगिर ता. फुलंब्री जि. औरंगाबाद ह.मु. फारोळा झोपडपट्टी ता. पैठण जि. औरंगाबाद याने केला आहे, अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने नमुद पथकाने नमुद आरोपींचा शोध घेतला असता आरोपी आसेफ शब्बीर सय्यद वय २७ वर्ष हा राहत्या घरीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया, अपर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, यांचे मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग पैठण विशाल नेहूल, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, सपोनि रामचंद्र मुंजे, पोउपनि विजय जाधव, प्रदीप ठूबे, सय्यद झिया, सफौ बालू पाथ्रीकर, दगडू जाधव पोह लहू थोटे, श्रीमंत भालेराव, दिपेश नागझरे, संजय घुगे, संतोष पाटील, नामदेव सिरसाठ पोना दिपक सुरोसे, परमेवर आडे, नरेंद्र खंदारे, उमेश बकले, शेख अख्तर, पुष्पांजली इंगळे, पोकॉ ज्ञानेश्वर मेटे, आनंद घाटेश्वर, संतोष डमाळे योगेश तरमाळे व पोलीस ठाणे बिडकीन येथील सपोनि संतोष माने, पोउपनि महेश घुगे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here