सातारा : सातारा शहरातील गुरुवार बाग येथे हातात कोयते आणि लाेखंडी पाईप नाचवून दहशत निर्माण करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात १० जणांवर शस्त्र अधिनियमाद्वारे गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी शहर ठाण्यातील हवालदार गणेश जाधव यांनी तक्रार दिलेली आहे. या तक्रारीनुसार सुरज दत्ता गाडे, प्रसाद गवळी, नीतेश शिर्के (रा. गुरुवार पेठ, सातारा), ओंकार कुंभार, रोहीत खंदारे (पूर्ण नाव नाही. रा. माची पेठ, सातारा) आणि इतर पाच ते सहा जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. मंगळवारी (दि. २४) हा प्रकार घडला.
संशयितांकडे लोखंडी कोयते तसेच एकाकडे लोखंडी पाईपही होती. हे सर्वजण मोठ्याने ओरडून कोयता आणि पाईप नाचवत होते. यामुळे परिसरात दहशत निर्माण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक मते हे तपास करीत आहेत.