स्फोटकाच्या चाचणीकरता दहशदवाद्यांनी निवडली पुणे, सातारा, कोल्हापूरची जंगले!

0

पुणे : कोथरुड परिसरातून पुणे पोलिसांनी कारवाई करत दाेन परप्रांतीय तरुणांना ताब्यात घेतले होते.पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिल्यानंतर त्यांच्याकडून कारवाई करत तपास सुरु झाला.या प्रकरणी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.
                पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी रात्री नाकाबंदीत दाेन परप्रांतीयांना पकडण्यात आले होते. दोघांकडून काडतुसे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. पोलिसांनी या घटनेची माहिती राज्य दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) दिली.या संदर्भांत एटीएसने नायायालयात एक अहवाल सादर केला.अटक करण्यात आलेले दोन दहशतवाद्यांनी जंगलात बॉम्बस्फोटची चाचणी केल्याची माहिती एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात सादर केलेल्या अहवालातून समोर आले.तसेच, आरोपींवर दाखल गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here