उपविभागीय अधिकारी प्रशांत देशपांडे यांना सेवानिवृत्ती बदल निरोप

0

पैठण,दिं.१०(बातमीदार)  : जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत देशपांडे शासकीय सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाले त्यांना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने सेवानिवृत्तीमुळे निरोप देण्यात आला.

   कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता भार्गोदेव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कडाचे अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, जायकवाडी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव होते याप्रसंगी सेवानिवृत्त उपविभागीय अधिकारी प्रशांत देशपांडे यांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी बोलताना देशपांडे यांनी सांगितले की,मी सन १९८४ रोजी जायकवाडी पाटबंधारे विभागात हजर झालो होतो त्यावेळी मी नाथसागर प्रकल्प,भुंकप मापन केंद्र,डावा कालवा वडीगोद्री उपविभाग येथे माझी ३९ वर्ष सेवा मी पूर्ण करून सेवानिवृत्त झालो माझ्या कारकिर्दीत मी व माझ्या सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने मी विक्रमी पाणीपट्टी सिंचनाची वसुल केली होती त्याचे मला आज समाधान आहे.

     यावेळी सेवानिवृत्त सहाय्यक अधिक्षक अभियंता जयसिंग हिरे,शाखा अभियंता बबन बोधने पाटील, औरंगाबाद पाटबंधारे मंडळाचे सहाय्यक अधिक्षक अभियंता गजानन व्यव्हारे, उपविभागीय अभियंता भालचंद्र अजमेरा,मच्छींद्र खवले, उपविभागीय अभियंता दिपक डोंगरे,शाखा अभियंता बाळासाहेब सातपुते, श्री विसपुते,निंळकंठ पवार, नंदकिशोर ढाकणे,विनय शेळके,शाखा अभियंता मंदार शेळके सह पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

———-

फोटो : पैठण : जायकवाडी पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत देशपांडे यांचा सेवानिवृत्ती बदल सत्कार करण्यात आला.(छायाचित्र : गजेंद्र पाटील)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here