फुलंब्री प्रतिनिधी :- नवीन शैक्षणिक तंत्राची शिक्षकांना माहिती देऊन त्यांचे अध्यापन कौशल्य अद्ययावत करण्यासाठी खामगाव येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी आळंद केंद्राचे केंद्रप्रमुख संजय भूमे हे होते. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,खामगाव येथील विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले.
उपस्थित शिक्षक शिक्षिकांना तज्ञ मार्गदर्शकांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले.या मध्ये सांडू शेळके यांनी निपुन भारत च्या १७ पानी जीआर विषयी माहिती दिली. परमेश्वर मोहिते यांनी शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा याविषयी तर विजय पाटील यांनी दशसूत्री कार्यक्रमा विषयी माहिती दिली. सुनील चिकटे यांनी पॅट चाचणी विषयी मार्गदर्शन केले.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संजय भूमे यांनी विद्यार्थी व शाळा विकासासाठी शिक्षकांनी सर्वोतोपरी योगदान देण्याचे आवाहन केले.या प्रसंगी आळंद केंद्रांतर्गत ३१ शाळांचे १२४ शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सुरे यांनी केले.या शिक्षण परिषदेचे यशस्वीतेसाठी संजय सोनवणे,सोमीनाथ वाघ,जगन खरात,विठ्ठल सोनवणे,ज्योती काळे,प्रज्ञा ढवळे,उल्हास ढेपले,उज्वलकुमार म्हस्के यांनी परिश्रम घेतले.