पाटेगाव पुलावरून उडी घेत महिला डॉक्टरची सहा महिन्यांच्या बाळासह आत्महत्या

0

पैठण,दिं.२.(प्रतिनिधी): पैठण शेवगाव रस्त्यावरील असलेल्या पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलावरून एका महिला डॉक्टरने आपल्या सहा महिन्याच्या बाळासह पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केल्याचे घटना घडली असून सदर महिलेचा मृतदेह सापडला असून बाळाचा शोध सुरू आहे. ही घटना मंगळवारी (दि.१) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या महिला डॉक्टरने आत्यामहत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती पोलीस सूत्राकडून मिळाली आहे. पूजा प्रभाकर व्होरकटे (वय ३२ वर्ष )रा. भवानीनगर पैठण असे या मृत झालेल्या महिलेचे नाव आहे.

 

 डॉ पूजा ही मंगळवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास आपल्या सहा महिन्याच्या बाळासह रिक्षातून पाटेगाव येथील गोदावरी नदीच्या पुलाजवळ आली. व त्यानंतर आपल्या बाळासह पुलावरून नदीत उडी मारली. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरडा करून पैठण पोलिसांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख सह सहाय्यक फौजदार सुधीर वाहूळ यांच्यासह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी काही नागरिकांच्या मदतीने पाण्यात शोधकार्य सुरू केले. पाण्यात शोध घेतला असता काही तासात पूजाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान पोलिसांकडून बाळाचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here