पैठण पं.स. बी डी ओ डॉ ओमप्रसाद रामावत यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार.

0

पैठण,दिं.४:पैठण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ ओमप्रसाद रामावत यांचा राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्या हस्ते उल्लेखनीय कामगिरीसाठी सत्कार.                                            मुंबई येथे शुक्रवार 3 मार्च 2023 रोजी यशवंतराव चव्हाण केंद्र , नरीमन पॉईंट , मंत्रालय , मुंबई येथे महामहीम राज्यपाल,मा. मुख्यमंत्री , मा. मंत्री रोहयो व फलोत्पादन , मा. अपर मुख्य सचिव रोहयो विभाग तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थित राज्यातील विविध गुणवंत अधिकाऱ्यांचा महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत त्यांचा सत्कार करून प्रशसतीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.                          मुंबई येथे मनरेगा आणि विविध १७ विभागांच्या योजनांचे एकत्रीकरण करून, महाराष्ट्रातील नागरिकांना सुविधा संपन्न करण्यासाठी व मानव विकास निर्देशांकात वाढ घडूवून  आणण्यासाठी,  ‘ सर्वांगीण ग्राम समृद्धी ‘ योजनेचा शुभारंभ महामहीम राज्यपाल रमेश बैस , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , संदिपान भुमरे मंत्री रोहयो व फलोत्पादन यांच्या उपस्थित करण्यात आला  . याप्रसंगी महाराष्ट्र राज्यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा,  महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत उत्कृष्ट कार्य केल्याबाबत  मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी औंरगाबाद जिल्ह्यातील   पैठण पंचायत समितीचे  गटविकास अधिकारी  डॉ ओमप्रसाद रामावत यांचा उच्चांकी मनुष्य दिवस निर्मिती करण्याबाबत सत्कार करण्यात आला . मग्रारोहयो योजनेत पैठण तालुक्यात मागील वर्षी व या वर्षात उल्लेखनीय कामे करण्यात आली आहेत . यात मागील वर्षात जवळपास नऊ लक्ष मनुष्य दिवस निर्मिती करण्यात आली . सद्यस्थितीत 500 विहिरी ,  600 गोठे , 4000 एकर शेतीवर मोहोगणी वृक्षाच्या लागवडीची तसेच 500 एकर जागेवर  शेवगा लागवडीचे कामे प्रगतीपथावर आहेत . त्यासोबतच गावांतर्गत सिमेंट रस्ते , पेवर ब्लॉक,  पांदन रस्ते व मातोश्री ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत पांदन रस्ते यांची शेकडो कामे पूर्ण करण्यात आली तसेच  प्रगतीपथावर आहेत. ही सर्व कामे करण्यासाठी रोहयो तथा पालकमंत्री मंत्री संदिपान भुमरे  व मा मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेगा यांचे मार्गदर्शन वेळोवेळी प्राप्त झाले. तसेच नरेगा कक्षातील व बांधकाम विभाग पंचायत समिती येथील सर्व अधिकारी /कर्मचारी,  पैठण तालुक्यातील सरपंच , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक व रोजगार सेवक यांनी उत्कृष्ट काम केल्याने मला हा सन्मान प्राप्त होऊ शकला . तसेच माझ्या वैयक्तिक सन्मानापेक्षा पैठण तालुक्याचा ,  महाराष्ट्रातील सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थित मुंबई येथे सन्मान झाला ही अभिमानाची बाब आहे .अशी प्रतिक्रिया गट विकास अधिकारी डॉ ओमप्रसाद रामावत यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

   या उल्लेखनीय कार्याबद्दल गटविकास अधिकारी डॉ ओमप्रसाद रामप्रसाद यांचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, पंचायत समिती बांधकाम विभागाचे उपअभियंता संभाजीराव आसोले, ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खंडू वीर,शाखा अभियंता कमलाकर शिंदे,जायभाय,दुरपुडे, गंगाधर निसर्गंध, संदीप एडके, सतिश आखेगावकर, ईश्वर सोमवंशी, संदीप घालमे, नितीन निवारे, विनायक इंगोले,सागर डोईफोडे यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here