पैठण “शाश्वत विकास ध्येय” प्रशिक्षण

0

पैठण,दिं.२४:शाश्वत विकास ध्येयाचे स्थानिकीकरणा अंतर्गत प्रशिक्षण पंचायत समिती पैठण येथे व ग्रामपंचायत बिडकीन येथे संपन्न

    शासनाच्या विविध विकास योजनेची सांगड घालून ग्रामीण भागाचा शाश्वव विकासाचे नियोजन कसे  करावे याचे प्रशिक्षण यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्या प्राप्त मार्गदर्शक सूचना नुसार, पंचायत राज प्रशिक्षण केंद्र खामगांव व  पंचायत समिती पैठण यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत अंतर्गत ५ व्यक्तींना प्रशिक्षीत करण्याचे ध्येय आहे,  त्यानुसार सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, मुख्याध्यापक तसेच अंतर्गत काम करणारे कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ती, जल सुरक्षक, संगणक परीचालक, बचत गट महिला यांच्यासाठी दोन दिवशिय प्रशिक्षण पैठण तालुक्यात ग्रामपंचायत बिडकीन व पंचायत समिती पैठण येथे दि २० व २१ मार्च २०२३ रोजी संपन्न झाले.

      प्रशिक्षणासाठी तज्ञ प्रशिक्षक डॉ.मनोहर बंन्सलवार, पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य अजय झाडोकार, जी.डी.टिकार, यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण केंद्र पुणे येथुन प्रशिक्षण घेऊन आलेले प्रविण प्रशिक्षक तथा विस्तार अधिकारी पंचायत समिती पैठण दशरथ खराद, ज्ञानेश्वर थोरे, केशवराव झोंड, इंगळे, आदर्श ग्रामपंचायत पाटोदा सरपंच जयश्री दिवेकर, श्रीमती बिराजदार यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

     प्रशिक्षणाचा समारोप गटविकास अधिकारी पंचायत समिती पैठण डॉ ओमप्रसाद रामावत, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे, विस्तार अधिकारी दशरथ खराद,इंगळे, केशवराव झोंड, जि.डी.टिकार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करून करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here