पैठण,दिं.८.(प्रतिनिधी): प्रतिनिधी :- पैठण येथील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को बँक शाखा पैठण येथे सोमवार ८ जानेवारी २०२४ रोजी भव्य कर्ज मेळावा आयोजित केला होता. या कर्ज मेळाव्याला पैठण येथील असंख्य नागरिकांनी भेट देऊन उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.
या मेळाव्यात १०८ खातेदारांना कर्ज मंजुरीसाठी पात्र केले गेले व त्यांना तात्काळ कर्ज मंजुरी दिली जाणार आहे. अशी माहिती श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कचरे पासिंग ऑफिसर अनिकेत पुरी यांनी दिली आहे. व हया कर्ज सुविधेचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन श्री रेणुकामाता मल्टीस्टेट बँकेचे शाखाधिकारी प्रसाद कचरे पाटील ,पासिंग ऑफिसर अनिकेत पुरी यांनी केले आहे.