बोरगाव शिवारात २५ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू 

0

पैठण,दिं.९.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यातील धरणाच्या बॅकवाटर परिसरातील बोरगाव शिवारात २५ वर्षीय महिलेचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दि.८ शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.अर्चना भाऊसाहेब फाटक वय २५ असे या मयत महिलेचे नाव आहे.

या बाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,पती- पत्नी मेंढ्या चारण्यासाठी आले होते दि.८ शनिवार रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अर्चना भाऊसाहेब फाटक वय २५ रा.चकलांबा ता.गेवराई यांचा  बोरगाव शिवारातील धरणाच्या बॅकवाटर परिसरातील पाण्यात बुडून मृत्यू झाला या बाबत ची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यास मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत अर्चना फाटक यांना स्थानिकांच्या मदतीने पाण्याबाहेर काढत पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यास वैद्यकीय यांनी तपासून मयत घोषित केले.  या प्रकरणी एमआयडीसी  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here