पैठण दि.३०.(प्रतिनिधी) : ‘कै.भाऊराव पाटील शिसोदे यांनी शेतकर्यांच्या मुलांसाठी स्थापन केलेले प्रतिष्ठान कॉलेज हे मराठवाड्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कॉलेज आहे. या महाविद्यालयातून शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी अनेक क्षेत्रात नाव कमवत आहेत. त्या परंपरेतला तरूण कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो.’ अशी भावना रेणुकादेवी शरद सहकारी कारखान्याचे चेअरमन विलासबाप्पु भुमरे यांनी व्यक्त केली. ते प्रतिष्ठान महाविद्यालयात संपन्न झालेल्या कै. भाऊराव पाटील शिसोदे स्मृतिदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नारायणराव गोंडे पाटील हे होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र पा. शिसोदे, सचिव राजेंद्र पा. शिसोदे ,उपाध्यक्ष अशोकराव पा. निर्मळ, संचालक श्रीधरराव पाटील शिसोदे यांची उपस्थिती होती. सचिव राजेंद्र पाटील शिसोदे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत नानांच्या आदर्शावर वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट केले.अध्यक्षिय समारोप करताना गोंडे पाटील यांनी भाऊराव पाटलाच्या कार्याला उजाळा दिला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.जी.सोनकांबळे, उपप्राचार्य डॉ. तुरुकमाने, प्रा. चाटे, प्रबंधक शेखर शिंदे पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.अर्जुन मोरे,डॉ. झेंडे, डॉ. कुटे, डॉ. माजिद,इम्रान शेख, हिवराळे, बागुल, नाचन, बेळगे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचलन डॉ.हंसराज जाधव यांनी केले तर आभार डॉ. मनिषा काळे यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती.