महानिर्मिती सहा अभियंता ज्ञानेश्वर जगदाळे पा सेवानिवृत्ती निमित्त निरोप.

0

पैठण(प्रतिनिधी): पैठण येथील महानिर्मिती जलविद्युत केंद्राचे सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जगदाळे पाटील शुक्रवार रोजी सेवानिवृत्त झाल्याने त्यांना अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या वतीने जायकवाडी येथील प्रबोधिनी येथील सभागृहात देण्यात आला.

    महानिर्मिती जलविद्युत केंद्र पैठण येथील सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर सदाशिवराव जगदाळ पाटील हे सेवानिवृत्ती झाले असून त्यांनी आपल्या ३२ वर्षांची दीर्घ कार्यकाळ सेवा बजावली आहे . यानिमित्त महानिर्मिती कार्यालयामार्फत सेवानिवृत्तीचा समारंभ  आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उनमेष पाटील कार्यकारी अभियंता येलदरी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भरत सुलाने कार्यकारी अभियंता वैतरणा,प्रा.संतोष गव्हाणे ,प्रा.विश्वास गव्हाणे, पत्रकार सुरेश वायभट, आकाश तौर पाटील,भागचंद साळवे, जावेद शेख उपस्थित होते यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते सहाय्यक अभियंता ज्ञानेश्वर जगदाळे पाटील यांचा सपत्नीक सत्कार करून भेट वस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी महानिर्मिती जलविद्युत केंद्र पैठण येथील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here