मुधलवाडी ग्रामपंचायतला स्मशानभूमी व कब्रस्थानच्या जागेसाठी गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

0
फोटो : पैठण : मुधलवाडी ग्रामपंचायतला स्मशानभूमी व कब्रस्थानसाठी जागा मिळणे बाबत निवेदन प्रभारी गटविकास अधिकारी शिवाजी वने, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेश कांबळे यांना देण्यात आले.(छायाचित्र : विनायक मोकासे)

पैठण,दिं.२८ :  मुघलवाडी ग्रामपंचायतला स्मशान भूमी व कब्रस्थानसाठी जागा मिळणे बाबतचे निवेदन मुधलवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने पैठण येथील गटविकास अधिकारी यांना गुरुवार(दिं.२७) रोजी देण्यात आले.

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुधलवाडी ग्रामपंचायतीस हिंदू समाजासाठी व दलित समाजासाठी तसेच मुस्लीम समाजासाठी स्मशान भूमी व कब्रस्थान कुठलीही सरकारी जमीन व गावठाण उपलब्ध नाही त्यामुळे वरील समाजासाठी जायकवाडी किवा ईसारवाडी येथे २ ते ३ किमी पर्यंत अंत्यविधीसाठी जावे लागते त्यामुळे अत्यंत हाल होत आहे.

त्यामुळे संबंधित विभागाने विनंती  वरील सर्व बाबींचा विचार करून मुधलवाडी गावाच्या अंत्यविधीसाठी लागत असलेली जागा पैठण छत्रपती संभाजी नगर रोड वरील मौजे कातपूर शिवारातील गट नं १२८ मधील १०० आर असून मालकी गट क्र – १२८ मधील ०१ ही जागा तिन्ही समाजास स्मशानभूमी व कब्रस्थानसाठी सदर जागा उपलब्ध करून द्यावी. जेणे करून गावातील अंत्यविधीसाठी होणारे हाल थांबतील व गावाच्या अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध होणे गरजेचे आहे अशी मागणी मुधलवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच मनिषा भरत मुकुटमल, ग्रामपंचायत सदस्य जावेद मुन्शी कुरेशी यांनी केली आहे.याबाबत विभागीय आयुक्त, आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर व उपजिल्हाधिकारी पुनर्वसन विभाग, छत्रपती संभाजीनगर यांना सुध्दा निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here