फुलंब्री :- महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि राज्याच्या विकासाची पायाभरणी करणारे महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची ११२ वी जयंती जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाकोद येथे दिनांक १२ मार्च रोजी वैचारिक सभेने साजरी करण्यात आली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
प्रमुख व्याख्याते म्हणून उज्वलकुमार म्हस्के यांनी लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कर्तृत्वावर प्रकाश टाकून महाराष्ट्र राज्य घडविण्यात यशवंतरावांचे योगदान तसेच देशाचे उपपंतप्रधान,संरक्षण मंत्री,अर्थमंत्री म्हणून राष्ट्रीय पातळीवर त्यांनी केलेले मौलिक कार्य सविस्तर विशद केले. या प्रसंगी संगीता वाढोणकर,उमेश मुळे,नितीन शेळके,स्वप्नील पाटील,रूपाली घुगे यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची उपस्थिती होती.या वैचारिक सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सांडू शेळके यांनी केले.