पैठण,दिं.७.(प्रतिनिधी) : औरंगाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा सरचिटणीसपदी इंजि. जयवंतराव गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना नियुक्ती पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार कैलास पाटील यांनी दिले.
दिलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विषयी असलेली आपली निष्ठा व आपली कार्य करण्याची क्षमता पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्व सामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील या निवडीबद्दल इंजी जयवंतराव गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.