पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी) : राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपानजी भुमरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने पैठण तालुक्यातील वडजी येथील गावचे लोकप्रिय सरपंच भाऊसाहेब दादा गोजरे पाटील यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थीना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी ग्रामसेविका ज्योतीताई माहोरे ,उपसरपंच मोहन झिने, ग्रा.प.सदस्य गोविंद गोजरे ,लक्ष्मण गारुळे, दिपक झिने, शरद सहकारी कारखान्याचे संचालक सुभाष बाबा गोजरे, आण्णा गोजरे, शालेय समिती अध्यक्ष नवनाथ ताकपीर, उपअध्यक्ष किशोर गोजरे ,तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष बापूसाहेब महाराज गोजरे, सुभाष नाना भांड, मोहन ताकपीर, विकास झिने ,किशोर झिने सह शाळेतील शिक्षक व विद्यार्थी, सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.