पैठण ,ता.२१.(प्रतिनिधी): पैठण येथे मोहिनी एकादशी निमित्ताने बेशिस्तपणे रस्त्यावर अॅपे रिक्षा लावणा-या १० अॅपे रिक्षांवर वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण व पैठण पोलिस ठाण्याच्या वतीने गुन्हे दाखल करण्यात आले.
पैठण येथे मोहिनी एकादशी निमित्ताने श्री संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शनासाठी अनेक भाविक दर्शनासाठी पायी व वाहनाने येत असतात भाविकांना त्रास होईल या हेतूने अनेक अॅप्पे रिक्षा चालक हे त्यांचे वाहन रोडच्या मधोमध बेशिस्तपणे उभे असताना वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक किशोर पवार, पैठण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय देशमुख
यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण वाहतूक शाखेचे पोलीस जमादार सुधाकर कोळेकर बाळासाहेब लोणे, अन्वर शेख व पैठण पोलीस स्टेशनचे श्रीराम चेडे, दिनेश दांडगे या वाहतूक अंमलदारांनी बेशिस्त ॲपे रिक्षा वाहनावर पोलीस स्टेशन पैठण येथे गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केल्याने अॅपे रिक्षा सह अनेक वाहनधारकांचे धाबे दणाणले होते.
——–