2024 हे इतिहासातील सर्वात भयानक वर्ष’, टाईम ट्रॅव्हलरची खळबळजनक भविष्यवाणी

0

विशेष प्रतिनिधी
मुंबई :
2-3 वर्षे कोरोना काळात गेल्यानंतर लोकांनी सुटकेचा श्वास घेतलेला आहे. 2023 वर्ष तसं चांगलं गेलं. आता 2024 वर्षही चांगलं जाऊदे अशीप प्रार्थना नववर्षाच्या सुरुवातीला अनेकांनी केली असेल.
पण तरी संकट कधी कोणत्या रूपात येईल कुणीच सांगू शकत नाही. त्यामुळे या वर्षात काय घडेल आणि काय नाही, याची भीतीही अनेकांच्या मनात आहे. अशात स्वतःला टाईम ट्रॅव्हलर म्हणवणाऱ्या एका व्यक्तीने 2024 सालाबाबत खळबळजनक भविष्यवाणी केली आहे. हे वर्ष इतिहासातील सर्वात भयानक वर्ष असेल असं त्यानं सांगितलं आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

काही लोक जन्मतारखेवरून, काही चेहरा, हात पाहून भविष्य सांगतात. पण काही लोक असे आहेत जे आपण पुढील वर्षात जाऊन आलो आहोत असा दावा करत पुढे काय काय घडणार ते भविष्य सांगतात. हे लोक स्वतःला टाइम ट्रॅव्हलर म्हणवतात. असाच एक टाईम ट्रॅव्हर जो आपण 2804 सालापर्यंत 780 वर्षे पुढचं जग पाहिल्याचं सांगतो. त्याने 2024 साल इतिहासातील सर्वात भयानक वर्ष असेल असं म्हटलं आहे.
वन सिराला नावाच्या या व्यक्तीने @infinitytimetraveller या सोशल मीडिया अकाऊंटवरून दावा केला आहे की, या वर्षी मानवांना इतिहासातील सर्वात वाईट नैसर्गिक घटना पाहायला मिळणार आहे. अशा अनेक नैसर्गिक आपत्ती येतील की मोठं नुकसान होईल. व्यक्तीने तारखांसह आपत्तींचा उल्लेख केला आहे.

कधी कोणतं संकट?

30 मे – वेनम रेन नावाचं वादळ येणार आहे. या काळात इतका हानीकारक पाऊस पडेल की त्यामुळे काही प्रकारचे कर्करोग होण्याची शक्यता 25 टक्के असते.
13 सप्टेंबर – एक जोरदार वादळ येईल, ज्यामध्ये ताशी 500 मीटर वेगानं वारे वाहतील. हे 9 दिवस चालेल आणि लॅटिन अमेरिकेतील अनेक देशांना प्रभावित करेल.
4 ऑक्टोबर- या दिवशी यलोस्टोन ज्वालामुखीचा उद्रेक होईल, जो हजारो वर्षांपासून शांत आहे. हा एक सुपरज्वालामुखी आहे, ज्याचा उद्रेक झाल्यानंतर अमेरिकेतील जवळजवळ सर्व भाग राख आणि धुराने भरून जाईल.
25 डिसेंबर – वर्षाच्या अखेरीस, एक उल्का पृथ्वीच्या एका भागावर धडकेल. एक क्षेपणास्त्र याचा अर्धा भाग नष्ट करेल पण हा पृथ्वीचा एक भाग नष्ट करेल. हा भाग फ्रान्स, स्पेन, जर्मनी आणि इटलीसारख्या युरोपियन देशांचा होता.दरम्यान या दाव्याचं न्यूज18मराठी समर्थन करत नाही. ही भविष्यवाणी कितपत खरी ठरेल माहिती नाही. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here