लंडन : ब्रिटनमध्ये मजूर पक्षाने (लेबर पार्टी) बहुमताचा आकडा पार केला आहे. त्याचवेळी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा (कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टी) पराभव झाला आहे. ब्रिटनमध्ये 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा लेबर पार्टी म्हणजेच मजूर पक्षाची सत्ता येत आहे.
मजूर पक्षाचे नेते सर किएर स्टार्मर ब्रिटनचे नवीन पंतप्रधान होऊ शकतात. लेबर पार्टीने बहुमताचा 326चा आकडा पार केला आहे. लेबर पार्टीला आत्तापर्यांत 410 जागा मिळाल्या असून कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीला 119 जागा जिंकता आल्या आहेत.
सर कीर स्टार्मर यांनी सोशल मीडियावर मतदारांचे आभार मानले आहेत. किएर स्टार्मर हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनणार हे निश्चित आहे. 2020मध्ये जेरेमी कॉर्बिन यांच्या जागी स्टार्मर यांची मजूर पक्षाच्या नेतेपदी निवड झाली होती.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला जर 131 किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळाल्या तर या पक्षाचा तो आजवरचा सगळ्यात मोठा पराभव ठरेल.